‘कसाबच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी काँग्रेसच्या नेत्यांना पाकिस्तान पाठवणार’ ; भाजपच्या ‘या’ नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

Chandrasekhar Bawankule on congress । लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा येत्या २० मे रोजी पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. त्यांनी “20 मे नंतर मुंबईतील जनता अजमल कसाबच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी काँग्रेस नेत्यांना पाकिस्तानात पाठवेल,” असे वक्तव्य त्यांनी केलंय.
काँग्रेसच्या नेत्यांना पाकिस्तान पाठवणार Chandrasekhar Bawankule on congress ।
घाटकोपर उपनगरातील होर्डिंगच्या घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रहार केला आहे. यावेळी बोलताना, “काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजमल कसाबची बाजू घेतली आहे, त्यामुळे त्यांना मुंबईत प्रचार करण्याचा अधिकार नाही.” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, “खरे तर निवडणुकीनंतर मुंबईतील जनता कसाबच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस नेत्यांना पाकिस्तानात पाठवेल.” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.
२६/११ च्या प्रकरणात, विजय वडेट्टीवार यांनी मुंबई उत्तर मध्यचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर महाराष्ट्राचे माजी एटीएस हेमंत करकरे यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची माहिती लपवल्याचा आरोप केला. हेमंत करकरेंचा मृत्यूदहशतवादी अजमल कसाबच्या गोळी नाही तर आरएसएसच्या निष्ठावान पोलिसाने झाडलेल्या गोळीने झाला असल्याचं म्हटलं होतं .
सर्व जागांवर विजयाचा दावा Chandrasekhar Bawankule on congress ।
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्ताधारी महायुती आघाडी सर्व जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ आहेत, जिथे राष्ट्रीय पक्ष भाजप आणि त्याचा मित्रपक्ष शिवसेना प्रत्येकी तीन जागा लढवत आहेत. मुंबईतील या निवडणुकीत आम्हाला ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवायची आहेत. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत रोड शोसाठी येत आहेत आणि आम्ही सर्वजण उत्साहित आहोत” असेही त्यांनी म्हटले.





