धक्कादायक! चंद्रपूरमध्ये २५ वर्षीय कैद्याची गळफास लावून आत्महत्या
Updated On:

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने आज गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. उमेश नैताम (25) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील साखरटोला या गावचा रहिवासी असलेला उमेश नैताम हा खूनाच्या प्रकरणात शिक्षा भोगत होता.
बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास बॅरेक क्रमांक सहाच्या स्वच्छता गृहामागे या कैद्याने पांढऱ्या उपरण्याने गळफास लावून घेतल्याचे सुरक्षेत तैनात असलेल्या शिपायाला दिसले.
यानंतर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यासला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासनी करून या कैद्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले, अशी माहिती तुरूंग अधिकारी आत्राम यांनी दिली.





