“गद्दारांना पाडण्यासाठी मी विधानसभा लढणार” ; चंद्रकांत खैरेंनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू

Chandrakant Khaire on Vidhan Sabha | राज्यातील विधानसभेची निवडणूक आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अतितटीच्या लढतीत विजय संपादन न करू शकणार्या ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास चंद्रकांत खैरे इच्छुक असल्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास पश्चिममधून मी निवडणूक लढवणार, मला गद्दारांना पाडायचं आहे.असा निर्धारही चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केला आहे.
गद्दारांना पाडण्यासाठी मी विधानसभा लढणार Chandrakant Khaire on Vidhan Sabha |
विधानसभेविषयी बोलताना,”उद्धव ठाकरे यांच्याकडून जर आदेश आल्यास संजय शिरसाट पाडण्यासाठी मी लढेल, बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी देण्याचं लोकांना पटत नाही. राजू शिंदे यांना अंबादास दानवे यांनी प्रवेश मला विचारून दिल नाही. मला पाडण्यासाठी राजू शिंदे यांनी मदत केली, त्यामुळे अशा लोकांना कोण मदत करणार. परिणामी छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे. माला गद्दारांना धडा शिकवायचा आहे, म्हणून मी विधानसभा लढणार,” अशी जाहीर घोषणा चंद्रकांत खैरे यांनी केलीय .
‘या’ मतदारसंघातला मी पहिला हिंदू आमदार Chandrakant Khaire on Vidhan Sabha |
तसेच “या मतदारसंघात पहिला हिंदू आमदार मी झालो होतो. सध्या यांचा पैश्यांचा उन्मद सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मला पैश्याने पाडण्यात आले. आता शरद पवार आणि काँग्रेसचा वलय आहे. त्यामुळे 140 जागा आम्ही लढवणार असल्याची तयारी आहे. तर आमची 103 जिंकणार असल्याची तयारी असल्याचा विश्वासही चंद्रकांत खैरे यांनी बोलताना व्यक्त केला.





