चंद्रकांत खैरे आक्रमक म्हणाले,‘रमेश बोरनारेंनी पैसे देऊ माणसं सोडली, गोंधळ घातला’

मुंबई – शिवसेना पक्षातील फुटीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राज्यभर मेळावे घेताहेत. शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. अशात औरंगाबाद दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता चंद्रकांत खैरे यांनी थेट बोरनारे यांच्यावर आरोप केले आहेत. वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनीच लोकांना पैसे देऊन या कार्यक्रमात सोडलं, त्यांनीच गोंधळ घातला, असा गंभीर आरोप खैरे यांनी केला आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले,…
‘राज्यात शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशी शिवशक्ती-भीमशक्ती युती झाल्याने युतीत भांडणं लावून देण्याचा हा प्रकार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र तसं काहीही नाही. येथील गद्दार आमदारांनी हा प्रकार घडवून आणला आहे. वैजापुरात रमाईंची मिरवणूक होती. बोरनारे यांनी मुद्दाम तिथे काही लोकांना घुसवलं, त्यांना दारू पाजली. मग त्या लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.’





