“चंद्राबाबू नायडू खोटारडे, राजकीय स्वार्थासाठी…”; जगनमोहन रेड्डींंनी थेट PM मोदींना पत्र लिहित केले आरोप

Tirupati Laddu Controversy | तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्या जात असल्याच्या वृत्तानंतर आंध्र प्रदेशात सुरू झालेला राजकीय गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी गेल्या आठवड्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीमध्ये तिरुपती देवस्थानाच्या लाडू प्रसादामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ झाल्याचा आरोप केला होता. त्यांचा हा आरोप खरा असल्याचे नंतर प्रयोगशाळेतील निष्कर्षावरूनही समोर आले होते.
देवस्थानने भाविकांच्या भावना व विश्वास याच्याशी खेळ केला आहे. या प्रकरणाने देशभरातील भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तिरुमला तिरुपति देवस्थानममधील लाडू भेसळप्रकरणाच्या चौकशीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एसआयटीची घोषणा केली आहे.
नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत केली हस्तक्षेपाची मागणी
यानंतर आता तिरुपती येथील लाडू भेसळीच्या मुद्द्यावरून वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देत या प्रकरणात हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू खोट पसरवत असून केवळ राजकीय स्वार्थासाठी ते कोटयावधी भक्तांच्या भावना दुखावत आहेत, यासाठी त्यांना फटकारण्याची मागणीही रेड्डी यांनी मोदींकडे केली आहे. Tirupati Laddu Controversy |
तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या संरक्षक प्रक्रियेची माहिती देतानाच रेड्डी यांनी आठ पानी पत्रात तप्रधानांना नायडूंना फटकारून सत्य उघड करण्याचे आवाहन केले आहे. Tirupati Laddu Controversy |
‘नायडू यांना कठोर पद्धतीने फटकारणे आणि सत्य समोर आणणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे नायडू यांनी कोट्यवधी हिंदू भाविकांच्या मनात निर्माण केलेल्या शंका दूर होइल. तसेच खोटे पसरविल्याबद्दल नायडू यांना कठोरपणे समज देणे, तसेच या प्रकरणातील सत्य बाहेर येणेही गरजेचे आहे. त्यामुळे टीटीडीच्या पावित्र्यावर पुन्हा श्रद्धा बसू शकेल,’ असे रेड्डी यांनी पत्रात नमूद केले आहे. Tirupati Laddu Controversy |
दरम्यान, नायडू यांनी दावा केला होता की रेड्डी यांच्या मागील मुख्यमंत्रिपदाच्या काळात वापरलेल्या तुपात प्राण्यांची चरबी मिसळली गेली होती. यावर जगन मोहन रेड्डी यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पीएम मोदी यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.





