चंद्राबाबू नायडू यांनी बजावला मतदानाचा हक्क ; म्हणाले,”लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी”

Chandrababu Naidu । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 96 जागांवर मतदान होणार आहे. त्यात टीडीपीचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
मी सर्वांचे आभार मानतो Chandrababu Naidu ।
टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना, “माझ्या राजकीय कारकिर्दीत बूथवर एवढी गर्दी मी पाहिली नाही. अमेरिका, बेंगळुरू, चेन्नई येथून लोक मतदानासाठी येत आहेत. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लोक मतदानासाठी येत आहेत. त्यांचे मी आभार मानतो” असे त्यांनी म्हटले.
#WATCH | Guntur: After casting his vote, Former Andhra Pradesh CM and TDP chief N Chandrababu Naidu says, “…I am appealing to everyone to exercise their right to vote. People have come from abroad at their own expense to cast their vote. I thank everyone…” pic.twitter.com/CVcU7hwCRc
— ANI (@ANI) May 13, 2024
उज्ज्वल भविष्याची मागणी आपली जबाबदारी Chandrababu Naidu ।
तसेच पुढे बोलताना नायडू यांनी,”आपले मत देणे आणि उज्ज्वल भविष्याची मागणी करणे ही आपली जबाबदारी आहे. 100% (राज्यात टीडीपी सत्तेवर येईल)””…मी प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत आहे.” असे म्हटले.





