Chand Mera Dil Poster : धर्मा प्रॉडक्शन्सने त्यांच्या आगामी ‘चांद मेरा दिल’ या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या पोस्टरसोबतच सोमवारी सकाळी 11 वाजता सिनेमाबद्दल मोठी घोषणा होणार असल्याचे संकेत दिले आहेत. करण जोहर निर्मित या रोमँटिक सिनेमात अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता लक्ष्य मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. लक्ष्य ‘आरव’ तर अनन्या ‘चांदनी’ची भूमिका साकारत आहे. पोस्टरमध्ये लक्ष्यचा शर्टलेस लूक पाहायला मिळत असून, याविषयी बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. “प्रेमाचा कोणताही ठराविक मार्ग नसतो… थोडं वेडं व्हावं लागतं. आमच्या आरव आणि चांदनीला भेटण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता भेटूया.” असे आकर्षक कॅप्शन पोस्टरसोबत दिले आहे. View this post on Instagram A post shared by Dharma Productions (@dharmamovies) यामुळे सिनेमाचा टीझर किंवा ट्रेलर उद्या प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले असून प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. लक्ष्यच्या लूकचे कौतुक होत असून अनन्या पांडेच्या कास्टिंगवर काही नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. काही जण “पुन्हा अनन्या?” असे म्हणत ट्रोल करत आहेत, तर काहींनी ‘चांदनी’ या पात्रासाठी अधिक प्रभावी अभिनेत्रीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तरीही या सिनेमाची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय तरुण अभिनेत्री आहे. जी तिच्या स्टाइल, सोशल मीडिया उपस्थिती आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. ती अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. अनन्याने 2019 मध्ये आलेल्या स्टुडंड अॅाफ द इअर 2 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. हेही वाचा : Donald Trump: ‘इराणचा वरिष्ठ कमांडर ठार’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, शेअर केला व्हिडिओ