कोकणासह मराठवाड्यात आज पावसाची शक्यता; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी?

Maharashtra Rain Update | महाराष्ट्रात एकीकडे उन्हाचा तडका वाढलेला असताना पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. काल पुणे शहरासह उपनगरांमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यानंतर आज (ता. १६) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुणे, मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
आज (ता. १६) कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, कोल्हापूर, परभणी या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी बुधवारी तुरळक पाऊस पडला, तर विदर्भात हवामान कोरडेच होते, तसेच कोकण-गोव्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. कोकण आणि मराठवाड्यात आज आणि उद्या मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाचा शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
मराठवाड्यात पुन्हा पाऊस परतला
हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या 5 जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह जोरदार पाऊस होईल. मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने यंदा गेल्या काही दिवसांत उघडीप घेतली होती. परंतु पुन्हा पाऊस परतला आहे.
तर पुढील चार दिवस राज्यात बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. Maharashtra Rain Update |
हेही वाचा :





