Weather alert : पुढील 24 तासात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता; कुठे येलो तर कुठे अॅारेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्याला कोणता इशारा? वाचा..
Weather alert : पुढील 24 तासांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

Weather alert : हवामान विभागाने 30 मार्चला पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी पाऊस झाला. तसेच 1 ते 4 एप्रिल या काळात देखील घाट माध्यासह विविध ठिकाणी पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले होते. अशातच आता पुढे 24 तासांत विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खरंतर सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, या दिवसात पाऊस पडण्याचे कारण काय? तर उत्तरेकडे सक्रिय असणारे पश्चिमी झंझावात, अरबी समुद्रावरून वाहणारे दमट वारे या सर्व प्रक्रियांच्या एकत्रिकरणामुळे महाराष्ट्रात हवामान बदल सुरू आहे.
पुण्यात जोरदार
पुण्यात 30 मार्चला सायंकाळच्या सुमारास गारिपटसदृश्य पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. ही स्थिती सुधारत नाही तोच राज्यात पुढील 24 तासांत पुन्हा हवामान बदल्यांमुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना येलो तर काही जिल्ह्यांना अॅारेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाला सुरुवात झाली असून, काही भागांना गारपिटीनंही झोडपलं आहे. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान पावसामुळे झाले आहे. सध्या विदर्भ, मराठवाड्यापासून थेट कर्नाटक आणि तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत वाऱ्याचा प्रवाह खंडित होत असल्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि कोल्हापूरात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकणातसुद्धा बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि दमट हवामानाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा : Onion Price Drop : कांदा झाला मातीमोल! आळेफाट्यात लिलावात दराची मोठी घसरण; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी





