आजपासून खुला होणार ‘या’ कंपनीचा आयपीओ, शेअरची किंमत 50 रुपयांपेक्षा कमी; पाहा डिटेल्स

Upcoming IPO: कमी रक्कमेसह शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. आजपासून एक एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. Chamunda Electricals च्या आयपीओसाठी आजपासून गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे. या आयपीओची प्राइस बँड देखील कमी आहे.
Chamunda Electricals IPO ची माहिती
चामुंडा इलेक्ट्रिकल्सच्या आयपीओच्या शेअर्सचा प्राइस बँड 47-50 रुपये आहे. याची लॉट साईज 3000 रुपये आहे. म्हणजेच तुम्हाला कमीत कमी 3 हजार शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. तसेच, कमीत कमी दीड लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
आजपासून (4 फेब्रुवारी) हा आयपी खुला होणार आहे. तुमच्याकडे 6 फेब्रुवारीपर्यंत बोली लावण्याची संधी आहे. तर 11 फेब्रुवारीला NSE SME प्लेटफॉर्मवर याचे लिस्टिंग होईल.
Chamunda Electricals IPO ला ग्रे मार्केटमध्येही चांगला प्रतिसाद आहे. सध्या जीएमपीवर याची किंमत 10 रुपये आहे. म्हणजेच, शेअर्स 20 टक्के प्रीमियमसह लिस्ट होण्याची शक्यता आहे. कंपनी 29,19,000 इक्विटी शेअर्स जारी करणार असून, आयपीओच्या माध्यमातून 14.60 कोटी रुपये उभारणार आहे.
कंपनीच्या कामाबद्दल सांगायचे तर चामुंडा इलेक्ट्रिकल्स 66 केव्ही पर्यंतच्या सबस्टेशन्सचे ऑपरेशन आणि देखभाल, 220 केव्ही पर्यंतच्या इलेक्ट्रिकल सबस्टेशन्सची चाचणी आणि ते सुरुळीतपणे सुरू ठेवणे, 1.5 मेगावॅट क्षमतेच्या सोलर पॉवर जनरेशन पार्कमध्ये विशेष सेवा प्रदान करण्याचे काम करते.
या कंपनीची स्थापना जून 2013 मध्ये झाली. आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या पैशांचा वापर कंपनी नवीन उपकरणं खरेदी करणे, भांडवलाची गरज पूर्ण करणे, मुदत कर्जाची परतफेड व इतर आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी करणार आहे.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





