यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद आयसीसीकडे सोपवण्यात आलं आहे. मात्र, भारताने विरोध दर्शवल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सामने ‘हायब्रिड मॉडेल’ अंतर्गत पाकिस्तानातील तीन शहरे (रावळपिंडी, कराची आणि लाहोर) आणि दुबई येथे आयोजित केले जातील. टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. येत्या 19 फेब्रुवारीपासून या सामन्यांना सुरूवात होईल. यादरम्यान अचानक टीम इंडियाच्या माजी खेळाडूची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एन्ट्री झाली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन आहे. आयसीसीने शिखर धवन याची इव्हेंट ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आयसीसीने नुकतीच याची घोषणा केली आहे.आयसीसीने इव्हेंट ॲम्बॅसेडर एकूण चौघांची नावं जाहीर केली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर शेन वॉटसन, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी आणि पाकिस्तानच्या सरफराज खान याचा समावेश असणार आहे. शिखर धवनने दिली प्रतिक्रिया चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग होणं ही खास भावना आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत ॲम्बॅसेडर म्हणून सामन्याचा आनंद घेणं हा मोठा सन्मान असल्याचं शिखर धवन म्हणाला आहे. तसेच माझ्यसााठी ही खास स्पर्धा आहे. माझ्या या स्पर्धेसह अनेक आठवणी आहेत. शिखरने आपल्या कारकिर्दीत दोनवेळा टीम इंडियाकडून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया (Champions Trophy 2025 India squad) रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल,वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती. नॉन ट्रॅव्हलिंग सब्स्टीट्यूट- यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे. ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संपूर्ण वेळापत्रक…. 19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (नॅशनल स्टेडियम, कराची) 20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई) 21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (नॅशनल स्टेडियम, कराची) 22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर) 23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई) 24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी) 25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी) 26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर) 27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी) 28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गद्दाफी स्टेडियम, लाहोर) 01 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (नॅशनल स्टेडियम, कराची) 02 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गटविभागणी – अ गट- पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश. ब गट- दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड.