Champions Trophy 2025 : हायब्रीड मॉडेलसाठी PCBची तयारी सुरु, नक्वीनी घेतली UAEच्या अध्यक्षांची भेट…

कराची – भारताने पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक खेळण्यास स्पष्ट नकार दिल्याने, अखेर हायब्रीड मॉडेलचा अवलंब करण्यासाठी पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी अमिराती क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मुबशीर उस्मानी यांची भेट घेतली. त्यामुळे आयसीसीने दिलेल्या इशाऱ्याला पीसीबीने गंभीरपणे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
دئبی۔چئیرمین پاکستان کرکٹ بورڈ محسن نقوی کی متحدہ عرب امارات کے کرکٹ بورڈ کے سابق سیکرٹری و آئی سی سی ایسوسی ایٹس ممبر کمیٹی کے چیئرمین مبشر عثمانی سے ملاقات
چیمپئنز ٹرافی ٹورنامنٹ کے انعقاد کے حوالے سے اہم امور پر تبادلہ خیال
پاکستان اور یو اے ای میں کرکٹ کے فروغ کیلئے مزید… pic.twitter.com/kyuKjq1bX1
— PCB Media (@TheRealPCBMedia) November 30, 2024
सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानमध्ये संघ पाठविण्यासाठी मज्जाव केला होता. त्यामुळे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत सहभागी न झाल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान पीसीबीला सहन करावे लागले असते. यासाठी आयसीसीने देखील पीसीबीला यजमानपद भूषविण्यासाठी हायब्रीड मॉडेल अवलंबण्याचे निर्देश दिले होते.
Border–Gavaskar Trophy 2024/25 : ॲक्शन व कौशल्यांमुळेच बुमराह भेदक गोलंदाज – स्टीव्हन स्मिथ
त्यानुसार पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी अमिराती क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मुबशीर उस्मानी यांची भेट घेतली. उस्मानी हे आयसीसीच्या सहयोगी सदस्यांच्या समितीचे अध्यक्षही आहेत. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलचा अवलंब केल्यास भारताचे सर्व सामने युएईमध्ये होतील.

