ICC Champions Trophy : …तर दक्षिण अफ्रिका मारेल अंतिम फेरीत धडक; जाणून घ्या कसे असेल समीकरण?

भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर आता उपांत्य फेरीच्या सामन्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे तर न्यूझीलंडचा सामना दक्षिण अफ्रिकासोबत होणार आहे. या सामन्याचा दक्षिण अफ्रिकेला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका डायरेक्ट फायनलमध्ये धडक मारू शकते.
पाकिस्तानातील हवामान आता लहरी असल्याचं दिसून आहे. अवकाळी पावसाचा तीन सामन्यांना फटका बसला आहे. साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे तीन सामना पावसामुळे रद्द झाले होते. यामुळे काही संघाना मोठा फटका बसला होता. त्यामुळे उपांत्य फेरीतही असाच पाऊस पडला तर अंतिम फेरीचं गणित कसे असणार त्याबद्दल जाणून घेऊयात..
दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पाकिस्तानमधील गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. याच मैदानात अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला होता. तसेच ऑस्ट्रेलियाला थेट उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं होतं. पण उपांत्य फेरीत न्यूझीलंडला तसा फायदा मिळणार नाही.
5 मार्चला पावसामुळे सामना रद्द झाला तर त्यासाठी 6 मार्च हा राखीव दिवस ठेवला आहे. पण या दिवशीही सामना रद्द झाला तर मात्र दक्षिण आफ्रिका थेट फायनलमध्ये धडक मारेल. कारण ब गटात 6 गुणांसह दक्षिण अफ्रिकेचा संघ टॉपला आहे. त्यामुळे त्यांना थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. यामुळे पावसावर दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे.





