Chakan Accident : भीषण अपघात! चाकणमध्ये चालकाचा ताबा सुटला, बसने ५ गाड्या उडवल्या; एकाचा मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स बसने पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास निलम ट्रेडर्स, एकतानगर, चाकण येथे घडली.मारुती नागनाथ शिंदे (रा. खंडापूर, ता. जि. लातूर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. संतोष माधव भुसारे (वय २६, रा. फ्लॅट नं. ७, साई गणेश, एकतानगर, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
शत्रुघ्न ज्ञानोबा पवार (वय ३७, रा. ओमसाई हौसिंग सोसायटी, चिखली; मुळगाव तावशीगड, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी शुक्रवारी (दि. १७) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष भुसारे याले (MH-16 BC-2351) ही बस बेदरकारपणे चालवून दोन मोटारसायकलींना धडक दिली. यात मारुती नागनाथ शिंदे (रा. खंडापूर, जि. लातूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सागर पाटील हा गंभीर जखमी झाला. या धडकेमुळे इतर चार वाहनांचेही नुकसान झाले. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





