प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २६ डिसेंबर) रोजी चाकण रोड, खराबवाडी येथे दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.अजय हरीदास शिंदे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा चुलत भाऊ गणेश तुळशीराम शिंदे (वय ३५, रा. बर्गे वस्ती, चिंबळीगाव, ता. खेड, जि. पुणे) यांनी शनिवारी (दि. २७) याबाबत उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच ४६ एएफ ९५६७) या कंटेनर वरील अज्ञात चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालकाने कंटेनर निष्काळजीपणे व वेगाने चालवित मोटारसायकल (एमएच ४४ एएच ५२६९)ला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अजय शिंदे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तपास उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाणे करीत आहेत.