Satara | अतिट विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. मथुरा जाधव

अतिट, (प्रतिनिधी) – खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील अतिट गावातील अतिट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. मथुरा शंकर जाधव तर तर व्हाइस चेअरमन म्हणून श्रीमती जनाबाई गोपाळा चव्हाण यांची निवड बहुमताने करण्यात आली.
रिक्त झालेल्या चेअरमन व व्हा. चेअरमन या पदासाठीच्या निवडीची पंचकमिटी सभा दि. 6 सप्टेंबर रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधीक्षक अध्यासी अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाणयांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी संस्थेचे सर्व संचालकांच्या उपस्थितीत संस्थेच्या स्थापने नंतर पहिल्यांदा च चेअरमन होण्याचा मान सौ. मथुरा शंकर जाधव यांना तर व्हा. चेअरमन म्हणून श्रीमती जनाबाई गोपाळा चव्हाण यांची निवड बहुमताने करण्यात आली.
अतिट सोसायटीची स्थापना दि. 10/07/1950 नंतर म्हणजे जवळ जवळ 74 वर्षांनी हा योग अतिट गावात झाल्याने सर्व स्थरातून याचे स्वागत होत आहे.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख (शिंदे गट ) पुरुषोत्तम जाधव, शिवसेना महिला संघटक सौ. शारदा जाधव, समन्वय अध्यक्ष खंडाळा तालुका पै. रघुनाथ जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामदास जाधव, भाजप जिल्हा उपअध्यक्ष संभाजीराव जाधव पाटील यांनी मोलाचे सहकार्य करत हा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निवडीसाठी सहाय्यक अधिकारी म्हणून सचिव नवनाथ जाधव यांनी सहकार्य केले.
निवडीनंतर कोणताही जल्लोष न करता ग्रामदैवत मंडाई देवीचे दर्शन घेऊन दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ व संस्थेच्या सर्व सभासदांच्या प्रति ऋण व्यक्त करत संस्थेच्या दृष्टीने योग्य काम करण्याची हमी यावेळी ग्रामस्थांना दिली.





