पुणे जिल्हा | शिक्षक पतसंस्थेचे सभापती, उपसभापती बिनविरोध

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित खेड सभापतीपदी दिनेश ठाकूर व उपसभापती सुरेश आदक यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची सभापती उपसभापती पदाची नुकतीच निवडणूक झाली.
सभापतीपदासाठी दिनेश दौलतराव ठाकूर तर उपसभापतीपदी सुरेश विष्णू आदक यांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज न भरल्याने त्यांची सभापती, उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती बगाटे यांनी जाहीर केले. पतसंस्थेचे संचालक अशोक सावंत तुषार वाटेकर, साहिर शिकीलगार, तृष्णा घुमटकर, संदीप जाधव, तुकाराम शिंदे, यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले
संस्थेच्या मानद सचिवपदी विवेकानंद गायकवाड यांची निवड झाली असून सरचिटणीस म्हणून दत्तात्रय शिनगारे कामकाज पाहत आहेत. निवड प्रसंगी पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहरे, तालुका अध्यक्ष नारायण करपे, एकल शिक्षक मंचचे अध्यक्ष संजय राळे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे अध्यक्ष जालिंदर दिघे,
डीसीपीएस संघटनेचे सचिन गावडे, कास्ट्राईब संघटना तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिनगारे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष बबनराव गावडे, शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष अनिल तळपे, अनंता मुर्हे, संचालक रामचंद्र शिंगाडे, माजी सभापती मुगुटराव मोरे, प्रभाकर शिंदे, मारुती दिघे, दिलीप देशमुख, किरण भोसले, सदानंद माळशिरसकर, कुंडलिक सातकर, भाऊराव पांडे, बाबाजी शिंदे, शिक्षण समिती जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब लांघी यांच्यासह सभासद शिक्षक उपस्थित होते.
पतसंस्थेचे वैशिष्ठ्य
या आर्थिक वर्षाअखेर संस्थेचे भाग भांडवल 25 कोटी 49 लाख
सभासद ठेव 63 कोटी 56 लाख
सभासदांस कर्जवाटप 105 कोटी 74 लाख रुपये
बँकेतील गुंतवणूक 11 कोटी 65 लाख
यावर्षी 3 कोटी 48 लाख रुपये नफा
संस्थेची स्वतःची सुसज्ज अशी इमारत आहे.
संस्थेचे एकूण 1355 सभासद





