सीईटी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध

पुणे – येत्या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषि पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी ९ ते २७ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलतर्फे देण्यात आली आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यासाठी सीईटी सेलकडून १९ परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांतील गुणांच्या आधारे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास, नियोजन करणे शक्य होते. सविस्तर वेळापत्रक राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या अभ्यासक्रमांसाठी…
बीबीए, बीबीएम, बीएमएस, बीसीए : १ ते ३ एप्रिल
परिचारिका (नर्सिंग) : दि. ७ आणि ८ एप्रिल
शारीरिक शिक्षणशास्त्र : १६ मार्च
एमबीए, एमएमएस : १७ ते १९ मार्च
एलएलबी : २० आणि २१ मार्च
एमसीए अभ्यासक्रम : २३ मार्च,
बीएड. (जनरल अँड स्पेशल) : २३ ते २५ मार्च
शारीरिक शिक्षणशास्त्र : २७ मार्च
बीए. बीएड, बीएस्सी. बीएस, एमएड : २८ मार्च
हॉटेल मॅनेजमेंट : २८ मार्च
डिझाइन पदवी (बी.डिझाइन) : २९ मार्च





