जेईई-मेन्स परीक्षेसाठी लवकरच अर्जप्रक्रिया

पुणे – देशातील अभियांत्रिकी, आयआयटीसह विविध राष्ट्रीय पातळीवरील तंत्रनिकेतन संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई-मेन्स) २०२६ च्या पहिल्या सत्रासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असल्याचे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) दिले आहेत.
एनटीएने यापूर्वीच २०२६ मधील जेईई-मेन्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून, परीक्षा जानेवारी २०२६ आणि एप्रिल २०२६ अशा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. मात्र जानेवारी सत्रासाठी नोंदणी अद्याप सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता एनटीएच्या सूचनांमुळे अर्ज प्रक्रियेला गती मिळणार आहे.
एनटीएने विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेपूर्वी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळावर लवकरच आवश्यक लिंक लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सांगण्यात आले असून, अर्ज प्रक्रियेसाठी वेळोवेळी एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.





