“केंद्रातील सरकार पुढील चार महिन्यात बदलणार”; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

Jayant Patil | लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताचा आकडा गाठवण्यात अपयशी ठरला. मात्र एनडीएमधील घटक पक्षांच्या पाठिंब्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा तिसरा कार्यकाळ सुरू करण्यात यश मिळाले. मात्र यानंतर अनेकदा विरोधकांकडून एनडीए सरकार लवकरच कोसळणार असल्याचे विधान केले. यानंतर आता शेकाप नेते जयंत पाटील यांनी देखील पुढील ४ महिन्यांत केंद्रातील सरकार बदलणार असल्याचा मोठा दावा केला आहे.
साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी हे विधान केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केंद्रातील सरकार कोसळणार असल्याचे विधान केले होते.
नेमकं काय म्हणाले शेकापचे जयंत पाटील?
“पुढील चार महिन्यात केंद्रातील सरकार बदलणार आहे. त्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत जातील. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा अनेक वर्षांचा कार्यकाळ दिल्लीत घालवलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल. मी सुद्धा इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे. त्यामुळे हे सांगत आहे,” असे शेकापच्या जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील यांचा विधानपरिषदेत पराभव
नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला.23 मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण करता न आल्याने त्यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली. यात नार्वेकरांचा विजय झाला. मात्र जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा :





