सातारा | कराड उत्तरमध्ये सत्तेचे केंद्रीकरण

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ यशवंत विचारांचा आहे. दुर्दैवाने आज या मतदारसंघात सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. विद्यमान आमदारांनी विकासाचे राजकारण न करता, फक्त उसाचे राजकारण केले आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केली.
जलजीवन मिशन अंतर्गत बोरीव (ता. कोरेगाव) येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. भाजपचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूकप्रमुख मनोज घोरपडे, रहिमतपूर मंडलाध्यक्ष भीमराव पाटील, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, नगर परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते नीलेश माने,
जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, संतोष जाधव, शिवसेना शहरप्रमुख दीपक माने, युवा नेते देवराज देशमुख, श्रीरंग मिराशे, चंद्रकांत दिवसे, सरपंच राजेंद्र पुजारी, उपसरपंच प्रमिला पोळ, संगीता पवार, चंद्रकांत पोळ, सुनील पोळ, बाळू पोळ, सुनंदा जाधव, सुनीता पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कदम म्हणाले, एकाच घरात अनेक वर्षांपासून सत्ता आहे. कराड उत्तरची जनता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही कोट्यवधी रुपयांचा निधी या मतदारसंघात उपलब्ध केला आहे. गावोगावी विकासकामे सुरू आहेत. ऊस उत्पादक शेतकर्यांची आजपर्यंत पिळवणूक होत होती, ती आता होणार नाही. आपल्या मतदारसंघात दोन-दोन साखर कारखाने पर्याय म्हणून शेतकर्यांना उपलब्ध आहेत. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल धैर्यशील कदम व मनोज घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला.





