Local Train Accident : आज सकाळी गर्दीच्या वेळी डोंबिवलीजवळ रेल्वे अपघात झाल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एका रिकाम्या लोकल गाडीचा डबा डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान रुळावरून घसरला. (Local Train Accident) सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने, संबंधित लोकल रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघाताचा परिणाम मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील, म्हणजेच मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. Local Train Accident : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! डोंबिवलीजवळ लोकलचा डबा रूळावरुन घसरला, नेमकं काय घडलं? अपघातानंतर अनेक गाड्या ठप्प झाल्या असून सध्या किमान तीन लोकल गाड्या जागीच थांबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला असून काही प्रवासी ट्रॅकवर उतरून पायी मार्गक्रमण करताना दिसत आहेत. दरम्यान, डोंबिवली, कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली आहे. कामाच्या वेळेमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली असून अनेक गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. काही गाड्या रद्द होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. (Local Train Accident) या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हेही वाचा : Shruti Haasan: ‘मम्मा’ म्हणताच पापाराझींवर भडकली श्रुती हासन! व्हिडिओ व्हायरल