अजय देवगणच्या ‘रेड २’ चित्रपटात बदल करण्याचे सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

Raid 2 Film | अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची जोडी ‘रेड २’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासून ‘रेड’ चित्रपटाच्या सीक्वेलची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. अखेर आता ‘रेड २’ चित्रपट १ मे २०२५ रोजी रिलीज होणार आहे. मात्र त्यापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना ‘रेड २’ चित्रपटात काही बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने ‘रेड २’ चित्रपटाला कोणताही सीन न हटवता हिरवा झेंडा दाखवला होता. पण आता बोर्डाने प्रदर्शनाच्या मुहूर्तावरच निमार्त्यांना दोन डायलॉग्स बदलण्यास सांगितलं आहे.
शिवाय चित्रपटातील ८ सेकंदाचा डायलॉग हटवण्यास सांगितलं आहे. माहितीनुसार, जिथे रेल्वे मंत्री शब्दाच्या जागी मोठे मंत्री असा बदल केला आहे. तसंच चित्रपटाच्या सुरुवातीला येणारा ८ सेकंदाचा “पैसा, हथियार, ताकत” हा डायलॉग हटवण्यास सांगितलं आहे. Raid 2 Film |
रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत
दरम्यान, ‘रेड २’ या चित्रपटात अजय देवगण नायक असून खलनायक रितेश देशमुखला दाखवण्यात आलं आहे. रितेश दादा मनोहर भाईच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे आता ‘रेड २’ मध्ये अजय व रितेशच्या जोडीची कमाल पाहायला मिळणार आहे. Raid 2 Film |
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ हा २०१८ च्या हिट चित्रपट ‘रेड’ चा सिक्वेल आहे. पहिल्या भागाचे मनोरंजक कथानक आणि प्रामाणिक आयकर अधिकाऱ्याच्या भूमिकेत अजय देवगणच्या दमदार अभिनयासाठी कौतुक झाले.
पुढच्या भागातही छापे आणि भ्रष्टाचाराची कहाणी सुरूच आहे. यावेळी अजय देवगणचा सामना रितेश देशमुखशी होईल. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुखसह वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक आणि अमित सियाला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटाचे राज कुमार गुप्ता यांनी दिग्दर्शन केलं आहे.
हेही वाचा :
Pune Gramin : शिरूर तहसीलदारांच्या आदेशाला विरोध; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल





