पुणे | नौरोसजी वाडिया महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोष

पुणे, ( प्रभात वृत्तसेवा) – मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयात नौरोस २०२४ चा सांस्कृतिक महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सर्वच विभागाच्या माध्यमातून विविध प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषा, केशभूषा, पोवाडा, लावणी, संगीत, नृत्य यांना विशेष महत्त्व देण्यात आले.
या वेळी विविध निबंधलेखन, कथाकथन, नाट्याभिनय, वक्तृत्व, रांगोळी यांसारख्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. खाऊ गल्ली यांसारख्या उपक्रमातून खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल देखील लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना, वाव मिळवून देण्याच्या हेतूने सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून शिक्षकांनी कलांचे सादरीकरण केले.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप, डॉ. अशोक चांडक, सीएफओ गणेशन, प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार, उपप्राचार्या डॉ. समिना बॉक्सवाला-काळे, डॉ. भरत बहुले, प्रबंधक राजेंद्र तागडे, डॉ. मंजुषा मुसमाडे, प्रा. नितीन अभ्यंकर, प्रा. स्मिता निरफराके, प्रा. शोभा धांडोरे, डॉ. हनुमंत लोखंडे, प्रा. जयवंत साळवे, प्रा. प्रमिला दस्तुरे, डॉ. सुभाष अहिरे, एल. एम. चौधरी, डॉ. विकास जाधव, प्रा. प्रमोद शिंदे, डॉ. विवेक अंताड, डॉ. विठ्ठल बोरकर, डॉ. समिंदर घोक्षे, डॉ. महेश पांढरपट्टे, डॉ. आत्माराम आंधळे, डॉ. विजया जाडकर, डॉ. सीताराम लटपटे, डॉ. निलेश मुंडलिक, प्रा. परवेज बागवान, प्रा. अजित मुंढे, प्रा. अक्षय सोनवणे, प्रा. नागनाथ भुसनार, प्रा. विजया भोसले, प्रा. नंदकुमार निलाखे आदींनी महोत्सवात सहभाग घेतला.




