माहेर मधील अनाथ मुलांसोबत रक्षाबंधन साजरी

शिरूर : रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था व राष्ट्रवादी काँग्रेसशरद चंद्र पवार पक्ष यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रामलिंग रोड येथील माहेर संस्थेच्या मुलांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण सर्व ठिकाणी साजरा केला जातो.प्रत्येक बहीण ही भावाला ओवाळत असते व यावेळी भाऊ नेहमी बहिणीचा रक्षणाची जबाबदारी घेत असतो.
परंतु माहेर येथील मुल अनाथ आहेत,यांना बहीण नसल्यामुळे दरवर्षी रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा – राणी कर्डिले तेथे जाऊन बहिणीची जागा भरून काढत असतात. सर्व मुलांना राखी बांधून ,खाऊ वाटप करण्यात आला. मुल अतिशय आनंदित झाली. यावेळी भाऊ म्हणून समाजात वावरताना सर्व मुली आपल्या बहिण मानून,त्यांचे रक्षण केले पाहिजे, आपण चांगले विचार सोबत घेऊन जगले पाहिजे,आपल्या मुळे कोणत्याच बहीनीला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
प्रत्येक बहिणीला तुमचा कडून चांगल्या वागणूक,बहिणीला नेहमी भक्कम साथ हवी असते. हीच तिची ओवाळणी असते,असे मनोगत राणी कर्डिले यांनी व्यक्त केले.. यावेळी राणी कर्डिले,गीता आढाव,राणी शिंदे,सविता आढाव, डॉं. वैशाली साखरे, छाया अल्हाट,प्रीती बनसोडे ,ललिता पोळ,मंगल गायकवाड,मनीषा टेभेकर,सुजाता रासकर, डॉ .पाटील मॅडम उपस्थित होते.





