अरे देवा…….! चोर बाईक चोरायला आले अन् स्वत:चीच गाडी सोडून गेले; व्हिडीओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल

चोरीच्या विविध घटना आपल्या सतत ऐकण्यात, वाचण्यात आणि पाहण्यात येत असतात. कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता पैसे मिळवण्यासाठी अनेक जण चोरी कारण्याचा मार्ग अवलंबत असतात. चोरी करणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्यातून चोरी करणाऱ्याला कायदेशीर रीत्या शिक्षा देखील केली जाते.
चोरी करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात चपळाई लागते.जर ती जमली नाही तर मग खाली दिलेल्या व्हिडीओ मधील चोरांसारखी अवस्था होते. हे मंडळी बाईक चोरण्यासाठी आले होते.पण ते चोर त्यांची स्वतःचीच बाईक सोडून पळून गेले.आता अशी चोरी तुम्ही आजवर कोठेच बघितली नसेल.
नेमकं काय घडलं ?-
दोन चोर बाईक चोरण्याच्या विचाराने एका सोसायटीच्या आजूबाजूला चक्कर मारत होते.तेवढ्यात त्यांना एक बाईक चोरण्याची संधी मिळाली. मग काय कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ते थेट बाईक पळवण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्यांची ही चोरी मालकानं लगेचच पकडली. मग काय अख्खं कुटुंबच जे हाती लागेल ते घेऊन त्यांच्या मागे पळू लागचं. लोकांचा आवेश पाहूनच ते चोर इतके घाबरले की ते स्वत:ची बाईक सोडून पळून गेले. म्हणजे दुसऱ्याची बाईक चोरण्यासाठी आले होते पण स्वत:चीच बाईक सोडून पळून गेले.दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आये थे स्कूटी चोरी करने… अपनी भी छोड़कर चले गए…
🥲😂😂 pic.twitter.com/1w1loGZlvk
— Ambrish Yadav (@Ambrish89) April 23, 2023





