CBSE Result 2026 – केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी विक्रमी वेळेत पूर्ण करत निकाल दरवर्षीच्या तुलनेत एक महिना अगोदर जाहीर करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा देशाचा निकाल ९३.७० टक्के एवढा लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ०.०४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुणे विभागाचा निकाल ९३.६६ लागला आहे. देशातील निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. सीबीएसईच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा १७ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत ८४ विषयांसाठी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशातील २७ हजार ३३९ शाळांमधील २४ लाख ८३ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २४ लाख ७१ हजार ७७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील २३ लाख १६ हजार ६ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. ८ हजार ७५ केंद्रांवर ही परीक्षा झाली. गेल्या वर्षी ९३.६६ टक्के निकाल लागला होता. यंदा ९३.७० टक्के निकाल लागला आहे. यंदा निकालात किंचित सुधारणा झाली आहे. सीबीएसईने १ कोटी ६ लाख उत्तरपत्रिका तपासणीचे काम जलदगतीने पूर्ण केले आहेत. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल खूप लवकरच लागला आहे. दरवर्षीप्रमाणं यंदाही सीबीएसईच्या दहावीच्या निकालात मुलीच अव्वल ठरल्या आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड. मुलींचा निकाल ९४.९९ टक्के, तर मुलींचा निकाल ९२.६९ टक्के एवढा लागला आहे. ट्रान्सजेंडरचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे. सीबीएसईने अधिकृतपणे टॉपर यादी जाहीर केली नाही. गुणवत्ता प्रमाणापत्र त्या त्या विषयात अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. देशातील २ लाख २१ हजार ५७४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक, तर ५५ हजार ३६८ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. सीबीएसईच्या विभागनिहाय निकालात त्रिवेंद्रम आणि विजयवाडा विभाग अव्वल ठरले आहेत. या विभागांचा निकाल ९९. ७९ टक्के लागला आहे. नोएडा विभागाचा ८७.६६, दिल्ली ९७.३८ टक्के, केंद्रीय विद्यालयांचा निकाल ९९.५७ टक्के लागला असून, जवाहर नवोदय विद्यालयांचा निकाल ९९.४२ टक्के निकाल लागला आहे. सरकारी शाळांची टक्केवारी ९१.४३ टक्के आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश आले आहे. ते दुसऱ्या परीक्षेसाठी अर्ज दाखल करू शकतात. याशिवाय जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत मिळालेल्या गुणामुळे समाधानी नाहीत, ते विद्यार्थी १५ मे पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत. सीबीएसईकडून लवकरच दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज मागवले जाणार आहेत.