Manipur : नग्न धिंड प्रकरणाचा सीबीआयने हाती घेतला तपास
Updated On:

नवी दिल्ली :- मणिपूरमध्ये मे महिन्यात जमावाने दोन महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा तसेच त्यांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या प्रकाराचा तपास सीबीआयने हाती घेतला आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
या घटनेचा 4 मे रोजी चित्रित केलेला एक व्हिडिओ, ज्यामध्ये दोन महिलांना नग्नावस्थेत परेड करताना दाखवण्यात आले आहे, या महिन्याच्या सुरुवातीला व्हायरल झाला होता. त्यातून देशभरात मोठा गदारोळ झाला होता.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)कडे सोपविण्यात आले आहे. सीबीआयने मणिपूर पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध नोंदविलेली एफआयआर त्यांच्या कार्यपद्धतीनुसार ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात जमविण्यात आलेले पुरावे आणि अन्य माहितीही सीबीआयने ताब्यात घेतली आहे.





