आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर सीबीआयची छापेमारी
Updated On:

लोणावळा – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर मंगळवारी (दि. 18) सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. अतिशय गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आल्याने याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाला थांगपत्ताही लागला नाही.
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक व त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. मात्र नंतर ही कारवाई थंडावली होता. आत पुन्हा सीबीआयने अचानक हा छापा टाकल्याने त्यामधून काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरनाईक यांचा लोणावळ्याजवळील कुणेगाव ग्रामपंचायत हद्दीमधील एक रिसॉर्टमध्ये हा बंगला आहे. त्या ठिकाणी हा छापा टाकण्यात आला. सरनाईक या बंगल्यात कधी आले होते तसेच अन्य काही पुरावे मिळतात का, याचा तपास या पथकाकडून सुरू आहे. याकरिता रिसॉर्टचे सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.





