Bihar Politics : लालू आमच्याबरोबर आल्याने त्यांची CBI चौकशी – नितीशकुमार
Updated On:

पाटणा – लालूप्रसाद यादव हे आमच्याबरोबर आल्याने केंद्राकडून त्यांची नव्याने सीबीआय चौकशी करण्यात येत आहे असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे.
लालूप्रसाद यादव सध्या किडनी रोपण शस्त्रक्रियेसाठी सिंगापुरात गेले आहेत. या दरम्यानच्या काळात चारा घोटाळा तसेच लालू रेल्वे मंत्री असतानाच्या काळातील जुनी प्रकरणे उकरून काढून त्यांच्या विरोधात सीबीआय चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
यात लालूंबरोबरच विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, लालुंच्या दोन कन्या रागीणी आणि चंदा यांच्याही चौकशी आदेश जारी करण्यात आला आहे.
त्यावर बोलताना नितीाकुमार यांनी ही प्रतिक्रीया दिली. बिहार मध्ये नितीशकुमार यांनी भाजपला बाहेरचा रस्ता दाखवून राजदला जवळ केल्यापासून भाजपकडून लालुंच्या व त्यांच्या परिवाराच्या विरोधात सतत आरोप सुरू आहेत.





