Cashew: काजू हा अनेकांचा आवडता ड्रायफ्रूट आहे. चविष्ट असण्यासोबतच तो शरीरासाठीही अत्यंत फायदेशीर मानला जातो. प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि खनिजांनी भरलेला काजू रोजच्या आहारात घेतल्यास त्वचा, केस, हृदय, मेंदू आणि पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे तज्ज्ञही मर्यादित प्रमाणात दररोज काजू खाण्याचा सल्ला देतात. काजूमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम, आयर्न, कॉपर आणि फॉस्फरससारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. विशेषतः रक्तातील हिमोग्लोबिन (Hemoglobin ) कमी असणाऱ्या लोकांसाठी काजू उपयुक्त मानले जातात. त्वचेसाठी काजू खूप फायदेशीर आहेत. सुरकुत्या कमी ठेवण्यासाठी आणि त्वचा मऊ व चमकदार बनवण्यासाठी काजूमधील पोषक घटक मदत करतात. त्यातील प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य सुधारतात. त्यामुळे नियमित प्रमाणात काजू खाल्ल्यास त्वचा अधिक निरोगी दिसू शकते. (Cashew) केसांसाठीही काजू उपयुक्त आहेत. काजूमध्ये असलेले कॉपर केसांच्या वाढीस मदत करते आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास सहाय्य करते. तसेच काजूमधील फॅटी अॅसिड्स केसांच्या मुळांना मजबूत बनवतात. त्यामुळे केस मऊ, चमकदार आणि दाट राहण्यास मदत होते. Cashew: मूठभर काजू ठरतील आरोग्याचा खजिना! त्वचा, केस आणि हृदयासाठी जबरदस्त फायदे मानसिक आरोग्यासाठीही काजू फायदेशीर मानले जातात. त्यामध्ये मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅनसारखे घटक असतात, जे मूड चांगला ठेवण्यास मदत करतात. हे घटक शरीरातील सेरोटोनिनचे प्रमाण वाढवण्यास सहाय्य करतात. त्यामुळे ताण कमी होतो आणि चांगली झोप लागण्यास मदत मिळते. (Cashew) काजूमधील ओमेगा-३ फॅटी अॅसिड मेंदूच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे असते. हे मेंदूकडे रक्तपुरवठा सुधारण्यास मदत करते. त्यामुळे स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता सुधारू शकते. तसेच सूज कमी करण्यासाठीही काजू उपयोगी ठरतात. (Cashew ) हृदयासाठीही काजू सुरक्षित मानले जातात. यात हेल्दी फॅट्स असतात, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. मात्र उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी जास्त मीठ असलेले काजू टाळावेत. पचनसंस्थेसाठीही काजू फायदेशीर आहेत. त्यामध्ये फायबर आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. काजूमधील प्रीबायोटिक घटक शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. मर्यादित प्रमाणात रोज काजू खाल्ल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. त्यामुळे आहारात काजूचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.