Delhi Election : प्रचारादरम्यान महिलेला फ्लाईंग किस दिल्याने आपच्या ‘या’ आमदारावर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांच्याविरोधात एका महिलेशी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी एका महिलेकडे बघून फ्लाईंग किस दिले होते. यानंतर दिल्लीच्या संग्राम विहार पोलीस ठाण्यात आमदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार दिल्ली पोलिसांनी आमदारांवर कलम ११५ (२), ७८, १२७ (२), ३३३ आणि ३ (५) नुसार विनयभंग आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आमदार दिनेश मोहनिया फ्लाईंग किस देताना स्पष्टपणे दिसत आहेत.
Delhi Police registered a case against AAP MLA Dinesh Mohaniya for giving FLYING KISS during election campaign
Delhi Police has no time to stop Robbery, R@pe, M@rder etc, but has all the time when BJP need their service 🤡#DelhiAssemblyElection2025 pic.twitter.com/A3XhvXe1J5
— Veena Jain (@Vtxt21) February 5, 2025
याअआधी देखील दिनेश मोहनिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल
आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांच्याविरोधात कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१६ साली त्यांच्यावर ६० वर्षीय महिलेशी गैरवर्तन करत तिच्या कानाखाली मारल्याचा आरोप करण्यात आला होता. मोहनिया मतदारसंघात फिरत असताना तिने मोहनिया यांना ओळखले नाही.
त्यामुळे मोहनिया यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी तिचा हात पिरगळला. मोहनिया यांनी हा प्रकार थांबविण्याऐवजी महिलेच्या कानाखाली लगावली होती. यानंतर पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.





