Accident case : माजी खासदारावर गुन्हा दाखल; भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू
Accident case : अपघाताप्रकरणी खार पोलिसांकडून माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Accident case : मुंबईतील खार पश्चिममध्ये 28 सप्टेंबरच्या सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला होता, तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी, अखेर 71 वर्षीय माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका कसा घडला अपघात?
खार पश्चिममध्ये 28 सप्टेंबरच्या सायंकाळी सीडी रोड-16 वा रोड जंक्शनवर भीषण अपघाताची घटना घडली होती. सुधीर सावंत यांच्या एर्टिंगा कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये, दुचाकीवरील BMC कर्मचारी अय्यप्पन सेल्वराज हरिजन (41) यांचा मृत्यू झाला, तर अय्यप्पन यांच्या पत्नी नॅन्सी हरिजन (37) जखमी आहेत.
दुर्घटनेनंतर अय्यप्पन हे कारखाली अडकले होते, स्थानिकांनी कार उचलून त्यांना बाहेर काढले. त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्यानतंर, रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान अय्यप्पन यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य एका स्कूटीचालकालाही धडक बसल्याने त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
दरम्यान, मृतक अयप्पा हरिजन (४१) हे गेल्या एक वर्षापासून पालिकेत कार्यरत होते. त्यांची पत्नी ३७ वर्षीय नॅन्सी यांच्यासह ते सांताक्रूझमध्ये दोन मुलांसोबत राहत होते. सोमवारी संध्याकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास हे दोघे एका कार्यक्रमासाठी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते.
या अपघाताप्रकरणी खार पोलिसांकडून सुधीर सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून BNS कलम 106(1) आणि मोटार वाहन कायदा कलम 187 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Accident case
खार पोलिसांनी या प्रकरणी कार जप्त केली असून, गुन्हा दाखल केला. अपघातानंतर सावंत यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
सुधीर सावंतांची पार्श्वभूमी
सुधीर सावंत यांची पार्श्वभूमी लष्कर आणि राजकारणाशी आहे. ते प्रादेशिक सेनेचे निवृत्त ब्रिगेडियर आहेत. १९७६ मध्ये ते मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रुजू झाले होते. त्यांनी १९९१ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेसच्या तिकिटावर कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी मधू दंडवते यांचा पराभव करून १९९१ ते १९९६ या काळात खासदार म्हणून काम पाहिले. Accident case
हेही वाचा:





