माजी आमदार बाबाजानी दुर्राणींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

परभणी : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाथरी येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पाथरी येथील 60 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण कांबळे यांनी मंगळवारी पहाटे शेतात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्याआधी त्यांनी एक सुसाईट नोट लिहिली होती. या सुसाईट नोटच्या आधारे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरी पोलिसांनी दुर्राणी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
चिठ्ठी मिळाल्यानंतर कांबळे यांच्या नातेवाईकांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी साडेसात वाजता कांबळे यांचा मुलगा अजयसिंह याने पोलिसांत तक्रार दिली. त्यात पाथरी येथील बाबाजानी दुर्राणी यांना आपल्या वडिलांचे नावे असलेला माजलगाव रोडवरील कॅनालजवळील प्लांट तसेच शेत जमीनीमधील पडलेले प्लॉटिंग यातील ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत अशी माहिती दिली. त्यामुळे वडील तणावात असायचे अशी माहिती दिली.




