\n

24 तासांत आरोपींना अटक करण्यात आली नाही, तर गंभीर परिणाम  – प्रकाश आंबेडकर

\n

परभणीतील घटनेबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून इशारा दिला आहे. आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, परभणीत मराठा जातीयवादी समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यापुढील भारतीय राज्य घटनेची केलेली तोडफोड अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीच्या परभणी जिल्हा कार्याकर्त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केलेल्या विरोध प्रदर्शनामुळे पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून एका समाजकंटकाला अटक केली. मी सर्वांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पुढील 24 तासांत आरोपींना अटक करण्यात आली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

\n

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया –

\n

सदर घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलिस दलाने तात्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. पोलिसांनी संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच सरकारने जनतेला अश्वासित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच संविधान प्रेमी जनतेने देखील शांतता आणि संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

\n

भाजप नेते प्रविण दरेकर यांची प्रतिक्रिया –

\n

बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा अवमान सहन केला जाणार नाही. परभणीत घडलेल्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच संविधानाचा आदर केला आहे. संविधानाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अराजक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

\n

अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी

\n

कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन परभणीच्या जिल्हाधिकऱ्यांनी आंदोलकांना केले आहे. सदरील ठिकाणी आम्ही स्वत: भेट दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. अफवांवर विश्वास ठेवून कुठलेही गैरकृत्य करू नये. कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे म्हणत आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

\n

काल झालेली घटना दुर्दैवी – खासदार संजय जाधव

\n

काल झालेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध करतो. पण आता जी काही परिस्थिती आहे, ती शांततेने हाताळावी. या घटनेचा निषेध नोंदवताना इतरांना जो काही त्रास होणार नाही याचीही आपण काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन परभणीचे खासदार संजय जाधव केले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"परभणीत संचारबंदी, दुपारी 1 वाजतापासून इंटरनेटही बंद…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/12/parbhani-22.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/case-of-breaking-the-glass-of-the-replica-of-the-constitution-by-a-mentally-ill-person-parbhani-bandh-turns-violent-curfew-imposed-in-the-city-internet-also-shut-down#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/12/parbhani-22.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/case-of-breaking-the-glass-of-the-replica-of-the-constitution-by-a-mentally-ill-person-parbhani-bandh-turns-violent-curfew-imposed-in-the-city-internet-also-shut-down#webpage","name":"परभणीत संचारबंदी, दुपारी 1 वाजतापासून इंटरनेटही बंद…","url":"https://www.dainikprabhat.com/case-of-breaking-the-glass-of-the-replica-of-the-constitution-by-a-mentally-ill-person-parbhani-bandh-turns-violent-curfew-imposed-in-the-city-internet-also-shut-down","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/case-of-breaking-the-glass-of-the-replica-of-the-constitution-by-a-mentally-ill-person-parbhani-bandh-turns-violent-curfew-imposed-in-the-city-internet-also-shut-down#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/12/parbhani-22.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/case-of-breaking-the-glass-of-the-replica-of-the-constitution-by-a-mentally-ill-person-parbhani-bandh-turns-violent-curfew-imposed-in-the-city-internet-also-shut-down#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/case-of-breaking-the-glass-of-the-replica-of-the-constitution-by-a-mentally-ill-person-parbhani-bandh-turns-violent-curfew-imposed-in-the-city-internet-also-shut-down","name":"परभणीत संचारबंदी, दुपारी 1 वाजतापासून इंटरनेटही बंद…"}}]}}}

परभणीत संचारबंदी, दुपारी 1 वाजतापासून इंटरनेटही बंद…