बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात गुन्हा दाखल

बांगलादेश : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात दाखल झालेल्या हत्येप्रकरणी शनिवारी ढाका येथील न्यायालयात सुनावणी झाली. बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारच्या वृत्तानुसार, न्यायालयाने पोलिसांना सोमवार, 28 नोव्हेंबरपर्यंत तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हे प्रकरण मीरपूरमधील 18 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान झालेल्या मृत्यूशी संबंधित आहे.
या प्रकरणात हसीना आणि इतर 23 जणांना आरोपी करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 15 ऑगस्ट 2024 रोजी मृताच्या भावाने हसीना आणि अन्य 23 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
हसीनांवर खुनासह २२५ गुन्हे दाखल
हसीना हिंसेत थेट सहभागी असल्याचा किंवा त्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे, ज्यामुळे तक्रारदाराच्या भावाचा मृत्यू झाला. हसीना व्यतिरिक्त, त्यांच्या सरकारमध्ये माजी गृहमंत्री असदुझ्झमन खान, अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादिर, माजी कायदा मंत्री अनिसुल हक आणि माजी पोलिस आयजी चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांचाही समावेश आहे.
हसीनांवर आतापर्यंत 225 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 194 खून, 16 हत्याकांड, 3 अपहरण, 11 खुनाचा प्रयत्न आणि 1 विरोधी बीएनपी पक्षाच्या कार्यक्रमावर हल्ला यांचा समावेश आहे.





