सावधान! स्वाइन फ्लू पुन्हा पसरतोय

पाच नवीन रुग्ण आढळले; चौघे व्हेंटिलेटरवर

पुणे – पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहरातील वातावारणात बदल झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि मध्येच ऊन्हाचा चटका यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच आहे. मागील दोन दिवसांत शहरात स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण आढळून आले आहेत.

मागील आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली, परंतू ढगाळ वातावरण आणि धुळीच्या वाढत्या प्रमाणामुळे घसा खवखवणे, डोळ्यांची जळजळ, कणकणी यांसह सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून येत आहे. मागील दोन दिवसांत साडेसात हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यात 236 संशयितांना टॅमीफ्लूची औषधे देऊन विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, चौघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

संसर्ग टाळा
नागरिकांनी घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रूमाल बांधूनच घराबाहेर पडावे. घसा खवखवण करणे, दुखणे आणि सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी घराबाहेर पडू नये. परिसरात अस्वच्छता होणार नाही, याची काळजी घ्यावी. घर आणि परिसरात पावसाच्या साठलेल्या पाण्याला मोकळी जागा करून द्यावी. दमट वातावरण असल्यावर विशेष काळजी घ्यावी.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.