सावधान ! हिंसक व्हिडियो पाठविणाऱ्यांवर होणार कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी देशाच्या राजधानीतील हिंसाचाराचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. त्याशिवाय, तपासाला गती देण्यासाठी दोन विशेष तपास पथकांची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. दिल्ली हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४२ इतकी झाली आहे.
दरम्यान, या हिंसाचारात संबंधी सोशल मीडियावर दगडफेक करतानाचा एक व्हिडियो शेयर केले जात आहे तसेच दंगलीसंबंधी व्हिडियो सोशल मीडियावर त्याचप्रमाणे व्हाट्स अप्सद्वारे वायरल करण्यात आले येत आहे. या दंगलीसंबंधी सोशल मीडियावर फेक न्यूजचे प्रमाण वाढत आहे. यातच अशा युजर्सवर दिल्ली पोलिसांची करडी नजर असून अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,’सोशल मीडियाचा वापर करून समाजात हिंसाचार करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या साठी पोलिसांकडून एक व्हाटस अप्स नंबर नियोजित करणार आहे. या नंबरचा वापर करून हिंसक व्हिडियो पाठविणाऱ्याचा मोबाईल नंबरचा पोलीसांपर्यत नागरिक सेंड करू शकणार, पोलिसांद्वारे या नंबरचा तपास करणार येणार असून अशा सोशल मीडिया युजर्सवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली पोलीस अधिक्षक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.





