कान्स फिल्म फेस्टिव्हल उर्वशीचा ‘जलवा’

कान्स फिल्म फेस्टिव्हलकडे प्रत्येकाच्या नजरा खिळल्या आहे. फेस्टिव्हल दरम्यान दररोज अनेक भारतीय आणि परदेशी सेलिब्रिटींचे अनोखे लूक पाहायला मिळत आहे. दीप्ती साधवानीनंतर नुकताच उर्वशी रौतेलाचा लूकही समोर आला आहे. प्रत्येक वेळी आपल्या असामान्य शैलीने सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या या अभिनेत्रीने यावेळीही असेच काही केले.
View this post on Instagram
अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला कान्सच्या दुसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर दिस, यावेळी तिने गुलाबी रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये तिच्या शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गुलाबी बाहुलीसारखी दिसणारी ही अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. रेड कार्पेटवर चालत असलेल्या उर्वशीने कान्ससाठी खालिद आणि मारवानचा फुशियाचा पिंक ड्रेस निवडला होता. हा पोशाख डिझायनरच्या 2024 च्या विंटर कलेक्शनचा भाग आहे, ज्याला ‘सेरेन’ असे नाव देण्यात आले आहे. या स्ट्रॅपलेस ड्रेसची किंमत 4,17,298 रुपये आहे.
उर्वशीच्या या गुलाबी रंगाच्या रफल ड्रेसची डिझायनिंग खूपच सुंदर होती, या व्यतिरिक्त, हे स्वीटहार्ट नेकलाइनसह एम्ब्रॉयडरी कॉर्सेटने जोडलेले आहे. या ड्रेसचा रंग आणि डिझाइनमध्ये फ्यूशियाच्या फुलासारखे डिझाइन केलेत. या ड्रेससोबत, नाईफ प्लीट्स असलेले फॅब्रिक रफलिंग करून वापरले होते, जे फुलांच्या पाकळ्यांसारखे सुंदर दिसत होते.
थ्रेड एम्ब्रॉयडरी हाय थाई स्लिट कट ड्रेसमध्ये उर्वशी खूपच हॉट दिसत होती. ड्रेसच्या खालच्या भागासाठी नेट लेस फॅब्रिक वापरण्यात आले होते. उर्वशीने तिच्या ड्रेससोबत आलेला डिझायनर हेड बँड घेतला होता, जो पूर्णपणे गुलाबी आणि चांदीच्या रंगाच्या रत्नांनी भरलेला होता. तसेच, केसांचा पफ बन बनवून, साइड पार्टीशनसह फ्लिक्स काढले गेले. ड्रेस हायलाइट केले होते. तिच्या या लूकची सोशलवर चर्चा आहे. चाहते तिच्या फोटोवर लाइकवर व कंमेंट्सचा वर्षाव करत आहे.





