नेवासा बुद्रूक येथील गांजाची शेती पोलिसांनी केली उद्धस्त! आरोपी गजाआड

नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज अहिरे यांना रविवारी (दि.४) रोजी एका गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नेवासा बुद्रूक येथे असलेली गांजाची शेती शेवगांव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या आदेशान्वये व नेवासा पोलीस ठाण्याचे निरिक्षक धनंजय जाधव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पोलिसांनी यशस्वीरित्या शेतात धाडसत्र राबवून गांजाची शेती उध्दवस्त करत आरोपीला गजाआड करुन धडाकेबाज करवाई करण्यात नेवासा पोलिसांना यश आले.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,नेवासा बुद्रूक येथे आरोपी नामे सत्तार शौकत इनामदार याच्या घरासमोरील मोकळ्या जागेत गांजाची शेती असलेली झाडे असल्याची गुप्त माहिती रविवारी (दि.४) रोजी पोलीसांच्या एका खबऱ्याने दिली असता या घटनेची माहिती सहाय्यक पो.नि.अहिरे यांनी तातडीने नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांना दिली असता पोलीस निरिक्षक जाधव यांनी तपासाची चक्रे गुप्तपणे वेगाने फिरवत या घटनेची माहिती शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांना देवून त्यांच्या आदेशान्वये गांजाची झाडे असलेल्या शेतात नेवासा पोलिसांनी यशस्वीरित्या धाड घालून पंचासमक्ष पाहणी व खाञी करुन गांजाची झाडे असणाऱ्या नेवासा बुद्रूक येथील आरोपी सत्तार शौकत इनामदार याला ताब्यात घेवून गजाआड करण्यात पोलीसांना यश आले.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक सविस्तर माहीती अशी की,नेवासा पोलिसांना एका गुप्त बातमीदाराने नेवासा बुद्रूक येथे गांजाची शेती असल्याची माहिती मिळताच पो.नि.जाधव यांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत नेवासा बुद्रूक येथील सत्तार शौकत इनामदार यांच्या वस्तीवर पोलीस फौजफाटा दाखल झाला. गांजाची शेती असल्याची पक्की खात्री पोलिसांनी केली असता या शेतामध्ये सुमारे ४ ते ५ फुट उंचीचे गांजाची झाडे नेवासा पोलिसांना मिळून आले.यानंतर दोन पंचासमक्ष पोलिसांनी गांजाची झाडे उपटून मुळी बांधुन वजनकाटा केले असता एकुण ६ किलो गांजा यावेळी पोलीसांना मिळून आला. या गांजाची किंमत ६० हजार रुपये असल्याची माहिती यावेळी नेवासा पोलिसांनी माध्यमांना दिली व आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. या धडक कारवाईत नेवासा पोलीस ठाण्याचे पोसई भोंबे, पो.हे.कॉ.राठोड,पो.कॉ. हरी धायतडक, पो.कॉ. आप्पासाहेब वैदय,चालक पो.कॉ.भवर यांनी या कारवाईत विशेष परिश्रम घेतले. या घटनेचा अधिक तपास नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज अहिरे हे करत आहेत.
आपल्या परिसरामध्ये कोणी जर अफु – गांजाची शेती पिकवित असल्यास याबाबतची गोपनीय माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनजंय जाधव यांना मोबाईल फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून द्यावी माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहनही यावेळी पो.नि.जाधव यांनी जनतेला केले आहे. आरोपीला नेवासा न्यायालयासमोर हजर केले असता न्यालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे माहीती पो.नि.जाधव यांनी दिली.





