कॅमिला कॅम्बेलाचा “सिंड्रेला’ ऍमेझॉन प्राईमवर दिसणार

कॅमिला कॅम्बेलाचा लीड रोल असलेला “सिंड्रेला’ लॉकडाऊनमुळे आता थिएटरवर रिलीज होणार नाही. त्याऐवजी हा हॉलीवूडपट ऍमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. ऍक्शन आणि म्युझिकचा सुंदर मिलाफ असलेल्या या परीकथेला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करावे लागणार आहे.
यावर्षी जून महिन्यात हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र, करोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलली गेली होती. मात्र, आता त्या तारखेलाही “सिंड्रेला’ रिलीज होऊ शकणार नाही, हे लक्षात आल्यावर निर्मात्यांनी तो अमेझॉन प्राईमवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. ऍक्टर आणि टेलिव्हिजन होस्ट जेम्स कॉर्डनने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
कॅमिलाने “कॅमिला’ या आपल्या अल्बममधून पदार्पण केले होते आणि आता तिने अभिनयात उडी घेतली आहे. यावर्षी तिला दोन ग्रॅमी ऍवॉर्डचे नॉमिनेशन मिळाले आहे. हे दोन्ही नॉमिनेशन तिने गायलेल्या गाण्यांसाठीच आहे. आतापर्यंतची तिची कारकीर्द गायिका म्हणून असली तरी सिंड्रेलामध्ये ती प्रथमच अभिनय करणार आहे.





