लखीमपूर हिंसाचार प्रकरण : 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद – जयंत पाटील
Updated On:

मुंबई – उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पक्षाच्या वतीने ही मागणी समोर मांडण्यात आली. शेतकऱ्यांसाठी पुकारल्या जाणाऱ्या या बंदला महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना व काँग्रेस या घटक पक्षांनीदेखील पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीतर्फे ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. देशाच्या बळीराजावर हल्ला करूनही संबंधित आरोपींना अटक झालेली नाही, या गोष्टीचा बंदच्या माध्यमातून निषेध करणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.





