फुटबॉल महासंघाची ‘या’ प्रकरणी होणार कॅगकडून चौकशी
Updated On:

नवी दिल्ली – आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) गेल्या चार वर्षांत केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे. ही चौकशी केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या तक्रारीनंतर देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) करणार आहे. कॅगने यासाठी एक पथक नेमले असून महासंघाच्या आर्थिक व्यवहारांचे सखोल लेखापरीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र, यासंदर्भात कोणतेही पत्र मिळालेले नसून लेखापरीक्षण झालेला आर्थिक ताळेबंद सादर करणे ही सामान्य बाब आहे, असे स्पष्टीकरण देत महासंघाने याबाबत आणखी काही बोलण्यास नकार दिला आहे.





