पुणे | कोबी आणि टोमॅटोची दरवाढ

पुणे {प्रभात वृत्तसेवा] – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे सुमारे ९० ट्रक आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक काहीशी कमी झाली होती. पावसामुळे, तसेच वारीमुळे तोडणी कमी झाल्याने आवकेवर परिणाम झाला. मागणी जास्त असल्याने कोबी आणि टोमॅटोच्या भावात ५ ते १० टक्के वाढ झाली होती. इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक, गुजरात आणि आंध्रप्रदेश येथून हिरवी मिरची १० टेम्पो, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून तोतापुरी कैरी १ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी प्रत्येकी २ टेम्पो, कर्नाटकातून पावटा आणि घेवडा प्रत्येकी ३ टेम्पो, आंध्रप्रदेश तमिळनाडू येथून शेवगा ५ टेम्पो, इंदौर ९ टेम्पो गाजर आणि मध्य प्रदेशातून लसूण सुमारे ५ टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० गोणी, भेंडी, गवार, काकडी, कोबी प्रत्येकी ५ टेम्पो, टोमॅटो ५ हजार क्रेट, हिरवी मिरची ३ टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, फ्लॉवर ८ टेम्पो, भुईमूग शेंग २०० गोणी, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा सुमारे १०० ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० टेम्पो आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा :२५०-३००, बटाटा : २५०-३५०, लसूण : ११००-२२००, आले सातारी : ९००-११००, भेंडी : ३००-४००, गवार : ४००-८००, टोमॅटो : ४००-५५०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ५००-५५०, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : ३५०-३००, काकडी : १६०-२००, कारली : हिरवी ३५०-४००, पांढरी : २५०-३००, पापडी : ४००-४५०, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : २५०-३००, कोबी : ३००-३५०, वांगी : ३००-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १४०-१५०,
ढोबळी मिरची : ३००- ४००, तोंडली : कळी : २५०-३००, जाड : १५०-१६०, शेवगा : ७००-८००, गाजर : १५०-२५०, वालवर : ०४०-४५०, बीट : १६०-१८०, घेवडा : ७००-८००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ४५०-६००, मटार : १२००-१८००, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी : ५००-५५०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.





