मुंबई – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ नागपुरात मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती असून भाजप नेते देखील उपस्थिती आहे. भाजपचे बडे नेते या मोर्चात सहभागी झाले. तसेच हजारोच्या संख्येने नागरिकांनीही या रॅलीत आपला सहभागी नोंदवला. समर्थनार्थ निघालेल्या या रॅलीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली.
ही रॅली यशवंत स्टेडिअम ते संविधान चौक इथपर्यंत काढण्यात आली. संविधान चौकात या रॅलीचं रूपांतर सभेत झालं. यावेळी केंद्रमंत्री नितीन गडकरी यांनी सभेला उपस्थिती दर्शवली. त्याशिवाय श्री देवनाथ मठाचे पीठाधीश्वर आचार्य स्वामी जितेंद्र नाथ महाराज, गोविंद गिरी महाराजही सभास्थळी उपस्थित होते.
CAA के समर्थन में नागपुर वासियों की रैलीhttps://t.co/b0pEbi1DBu
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 22, 2019