हिमाचल प्रदेशमधील 6 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक

Himachal Pradesh Election| लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. सातव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या ५७ जागांवर मतदान होत आहे. सातव्या टप्प्यात 10.06 कोटी मतदार 904 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये बिहारमधील 8, चंदीगडमधील 1, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 3, ओडिशातील 6, पंजाबमधील 13, उत्तर प्रदेशमधील 13 आणि पश्चिम बंगालमधील 9 जागांचा समावेश आहे. ओडिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित 42 जागांसाठीही मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे हिमाचल प्रदेशातील चार जागांसह विधानसभेच्या 6 जागांसाठीही आज पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक हिमाचलमधील मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू सरकारचे भवितव्य ठरवणार आहे. हिमाचलमध्ये सुजानपूर, धरमशाला, लाहौल-स्पीती, बुरसार, गाग्रेट आणि कुतलाहारमध्ये पोटनिवडणूक होत आहे. ज्यामध्ये बंडखोर नेते राजिंदर राणा, सुधीर शर्मा, देविंदर कुमार भुट्टो, चैतन्य शर्मा, इंदर दत्त लखनपाल आणि रवी ठाकूर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे.
काँग्रेसने सहा बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले होते
हिमाचल प्रदेशच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेसने सहा बंडखोरांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर विधानसभेच्या सहा जागा रिक्त झाल्या. या आमदारांनी 29 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) मतदान केले आणि नंतर सर्व आमदारांनी भाजप पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता हे सर्व आमदार आपापल्या भागातील पोटनिवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवत आहे.
दरम्यान, 2022 मध्ये एकूण 68 विधानसभा जागांपैकी काँग्रेसने 40 जागा जिंकल्या होत्या, भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या आणि इतरांनी 3 जागा जिंकल्या होत्या. तर 2014 आणि 2019 मध्ये भाजपने हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या सर्व जागांवर विजय मिळवला होता.
हेही वाचा:
मतदान केल्यानंतर भगवंत मान यांचा आरोप ; म्हणाले,”vvpat मध्ये काही..”





