नवी दिल्ली – सन 2008 मधील वित्तीय पेचप्रसंगाचे भाकीत करणार्या अर्थतज्ञ पीटर स्विफ् यांनी एकूण परिस्थिती पाहता सध्या चांदीऐवजी सोने खरेदी करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत चांदीऐवजी सोने खरेदी करणे कमी जोखमीचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, मी सध्या माझ्याकडील चांदी विकणार नाही. मात्र खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकत आहे. सोने खरेदी करण्यास हरकत नाही असे त्यांना वाटते. सध्या सोन्याचा दर जागतिक बाजारात 4,534 डॉलर आणि भारतात 1 लाख 40 हजाराच्या जवळपास आहे. मात्र तरीही दीर्घ पल्ल्याचा विचार करता सध्याच्या सोन्याचे दर अधिक लाभदायक ठरू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. चांदीला 70 ते 75 डॉलर प्रति औंसावर चांगला आधार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चांदीचा दर 84 डॉलरपर्यंत जाऊन आता बराच कमी झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रात बरीच अस्थिरता आहे. ही अस्थिरता संपल्यानंतर चांदी खरेदीचा विचार करावा असे ते म्हणतात.