Pimpri : जमिनीच्या वादातून व्यावसायिकाला मारहाण
Updated On:

पिंपरी : जमिनीच्या वादातून चौघांनी एका व्यावसायिकाला मारहाण केली. ही घटना ६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास डुडुळगाव येथे घडली.
रामदास धोंडिबा पवार, अमर रामदास पवार आणि दोन महिला (सर्व रा. डुडुळगाव, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेंद्र तानाजी पवार (वय ४१, रा. डुडुळगाव, ता. हवेली) यांनी रविवारी (दि. ८) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे त्यांच्या जागेत थांबलेले असताना आरोपी तिथे आले.
जागेच्या वादावरून आरोपींनी पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करून लाकडी बांबू व दगडाने मारहाण केली. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





