Pune News : मुंबई-बेंगलोर महामार्गावर बसला भीषण आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित

पुणे : मुंबई-बेंगलोर महामार्गावरील स्वामीनारायण मंदिरासमोर प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले, मात्र चालक व वाहक यांच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच पुणे व पीएमआरडी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार ही घटना शॉर्टसर्किटमुळे घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या भीषण आगीत बसचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवाशांच्या जीवावर बेतणारी दुर्घटना टळल्याने सुटकेचा निःश्वास सोडला जात आहे.





