Bus Accident: बसची ट्रकला धडक, 32 प्रवाशी जखमी
Updated On:

अमरावती – पिंपळविहिर – सावर्डी मार्गावर नागपूरहून अकोटकडे जाणाऱ्या बसची ट्रकला पाठीमागून धडक बसल्याने अपघात झाला असून या अपघातात 32 प्रवाशी जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणताही जीवीतहानी झाली नाही. बसमध्ये 36 जण प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते अकोट बस क्र. एमएच 40 एक्यू 6433 या बसने एमएच 20 बीटी 7288 क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात एसटीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली आहे.





